कतरिना, दीपिका आणि रणबीरचा सिलसिला ?

१९८१ मधील‘ब्लॉकबस्टर’सिनेमा सिलसिला अजूनही सिनेचाहत्यांना लक्षात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला होता.. या सिनेमातील ‘प्रेम त्रिकोण’ प्रेक्षकांनाही चांगलाच भावला होता. याच सिलसिला चा रिमेक बनत असल्याची  चर्चा बॉलिवूडमध्ये पसरली आहे.

यशराज फिल्मस नव्या स्टार कास्टसोबत सिलसिलाचा रिमेक बनवण्याची तयारी करत आहे. कतरिना, रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण या रिमेकमध्ये एकत्र दिसण्याची चर्चाही रंगतेय. म्हणजे जयाच्या भूमिकेत कॅट, रेखाच्या भूमिकेत दीपिका आणि दोघींबरोबर ऑन स्क्रिन (आणि ऑफ स्क्रीनही) प्रेमाचे धडे रंगवणार्‍या नायकाच्या भूमिकेत… अर्थातच अमिताभच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसेल.‘

यशराज प्रॉडक्शन’ने हे लक्षात ठेवून या चित्रपटाच्या स्टारकास्टची आखणी केली असावी कारण खर्‍या आयुष्यात रणबीर हा दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड आणि सध्या कॅट आणि रणबीर या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय, असेच समजले जातंय. पहिल्या सिलसिला सिनेमाला सिनेचाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होतं, त्याच्या येणार्‍या रिमेकला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल ते सिनेमा बॉक्सऑफिसवर कळेलच…

 

Leave a Comment