पहिला फायनालिस्ट आज ठरणार

श्रीलंकेत सुरु असलेल्या टी-२० च्या विश्वचषकासाठी पाहिली सेमीफायनल आज (गुरुवारी) श्रीलंका व पाकिस्तान संघात होत आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये पोचणार असल्याने दोन्ही संघादरम्यान ही चुरशीची लढत गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास रंगणार आहे.

भारतीय संघ जरी टी-२० च्या विश्वचषक स्पर्धेरून बाहेर पडला आहे. त्यामुळे सध्या स्पर्धेत असललेल्या दोन्ही संघा आशियाचे असल्याने एक तर संघ जिंकेल अशी अपेक्षा आहे. श्रीलंका व पाकिस्तान या संघात जो संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये जाणार असल्याने आता विजय आवश्यक आहे,

टी-२० च्या विश्वचषकासाठी ५ सामने झाले आहेत त्यापैकी चार सामने पाक संघाने जिंकले आहेत. तर दुसरीकडे श्रीलंका संघाने ही ५ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला आहे. पाक व श्रीलंका संघात आतपर्यंत टी-२० चे नऊ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सहा सामन्यात पाकिस्तान तर तीन सामान्यात श्रीलंकेचा संघ विजयी ठरला आहे. त्यामुळे या सेमीफायनलच्या लढतीत पाकचे पारडे जड असणार आहे.

Leave a Comment