नवी दिल्ली दि.५- आर्थिक अडचणींचा आणि संपाचा सातत्याने सामना करत असलेल्या किंगफिशर विमान कंपनीला बँकांनी ६० कोटी रूपये देण्याची तयारी दाखविल्याने कंपनीला जीवदान मिळण्याचा संभव निर्माण झाला आहे. यातील ३० कोटी रूपये कर्मचार्यांच्या पगारासाठी देण्यात येत आहेत तर बाकी पैशांतून कांही उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.
किंगफिशरला थोडे जीवदान
हा निधी कंपनीला मिळात असला तरी सध्या सुरू असलेली टाळेबंदी १२ आक्टोबरपर्यंत सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीचे सीइओ संजय आगरवाल यांनी सांगितले. ते म्हणाले कर्मचार्यांचा सध्या सुरू असलेला संप बेकायदेशीर आहे. गुरूवारी कर्मचारी संघटनांशी झालेली बोलणी फिस्कटली असली तरी आज म्हणजे शुक्रवारी पुन्हा बैठक घेतली जात आहे. आयकर विभागाने आमची अकौंट खुली करायला परवानगी दिल्यामुळे त्यातून ३० कोटी रूपये मिळणार आहेत.
गुरूवारी कर्मचारी संघटनेशी बोलणी फिस्कटल्यानंतर कंपनी सेक्रेटरी भारत राघवन यांनी राजीनामा दिल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान किगफिशर ला क र्जे दिलेल्या कंपन्यांचीही तातडीची बैठक गुरूवारीच पार पडली आहे. तर विमानवाहतूक मंत्री अजित सिग यांनी डीजीजीएच्या परवानगीनंतरच किंगफिशरला त्यांची उड्डाणे सुरू करता येतील असे बजावले आहे.
