कार्टून्सीट असीम त्रिवेदी दिसणार बिग बॉसमध्ये

या वेळेस बिग बॉसचे घर अण्णाच्या आंदोलनात सहभागी झालेल्यामुळे फुलून जाणार आहे असे दिसते. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात कवी आणि अण्णाच्या आंदोलनात सहभागी झालेले कुमार विश्वास पाहुणे म्हणून सहभागी होणार असल्याचे समजले होते. त्यापाठोपाठ आता कार्टून्सीट असीम त्रिवेदी आता बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते.

काही दिवसापूर्वींच कार्टून काढल्याच्या देशद्रोहाच्या आरोपातून असीम त्रिवेदीला अटक करण्यात आली होती. असीम त्रिवेदी अण्णाचे आंदोलन आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनशी जोडलेले आहेत. कलर वाहिनीच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी त्रिवेदीशी संपर्क साधण्यात आला आहे.

असीम त्रिवेदी बिग बॉस मध्ये सहभागी होऊन नागरिकांना त्यांनी काढलेल्या कार्टूनबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कुमार विश्वास आणि असिम पूर्वीपासून एकत्रित काम करीत असल्याने या वादग्रस्त विषयवार ते चर्चा करतील असे वाटते. त्यामुळेच असिमाला निमंत्रण देण्यात आले आहे.