आयफोन ५ चा कॅमेरा सदोष

अॅपलच्या आयफोन ५ ने बाजारात येण्यापूर्वीच विक्रीचे विक्रम नोंदविले असले तरी आता जे या फोनचा वापर करू लागले आहेत त्या युजरकडून येणार्‍या तक्रारींचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीच युजरनी आयफोन ५ चे मॅप सदोष असल्याच्या तक्रारी केल्यानंतर आणि त्या खर्‍या असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कंपनीचा सीईओ टीम कुक याने ग्राहकांची जाहीर माफी मागितली होती. या नाट्याला फारसा कालावधी लोटला नसतानाच आता आयफोन ५ मधील कॅमेराही सदोष असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.

विशेषतः या कॅमेर्‍यातून प्रकाशात फोटो घेतले तर त्यात जांभळे डाग येत आहेत. तसेच फोनच्या कोपर्‍यातून निघणार्‍या लाईटबाबतही युजर समाधानी नाहीत. कॅमेर्‍याच्या तक्रारी येण्याचे प्रमाण वाढले असले तरी अॅपलने मात्र अजून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

Leave a Comment