सलमानच्या चालकाची धुलाई

सलमान खानची ओळख बॉलीवूडचा दबंग अशी असल्याने सर्वचजन त्याला घाबरतात. मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या एका घटनेवरून नागरिकानी सलमानच्या चालकाची चांगलीच धुलाई केली असल्याचे उघड झाले आहे. ही घटना पाचगणी जवळ घडली असल्याचे उघड झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून सलमान खानच्या ‘दबंग-२’ या सिनेमाची शूट पाचगणी जवळ सुरु आहे. पाचगणी शहरापासून २० किलो मीटर अंतरावर असलेल्या भिवडी गावाजवळ सलमानची गाडी घेऊन त्याचा चालक आला होता. त्यावेळी गावातील नागरिकांनी सलमानचा चालक व बॉडीगार्डला मारहाण केली. यावेळी सलमान खान गाडीत नव्हता.

यावेळी सलमानचा चालक रस्त्यावरून वेगाने गाडी चालवत होता. पाठीमागून येत असलेल्या वाहनांना तो रस्ता देत नव्हता. एका जीप चालकाने त्याला ओवरटेक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने साईड न दिल्याने दोन्ही वाहनाची धडक झाली. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी सलमानच्या चालकाची व बॉडीगार्डची धुलाई केली. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.