ब्रिक्स देश करणार बँकेची स्थापना

बीजिंग: ‘ब्रिक्स’ देशांनी स्थापन केलेल्या अभ्यास पथकाच्या सदस्यांची ब्रिक्स विकास बँक स्थापन करण्याबाबत सहमती झाली आहे. सदस्य देशांना गुंतवणूक आणि वित्तसेवा देण्याबरोबरच जागतिक बँकेसारख्या आर्थिक संस्थांना अर्थसहाय्य करण्याचे काम या बॅंकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्था असलेले ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांची ब्रिक्स विकास बँक स्थापन करण्याबाबत विचार पुढे आला. या बँकेची व्यवहार्यता, आवश्यकता तपासून पाहण्यासाठी सदस्य देशातील तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या अभ्यास गटाची स्थापना करण्याचा निर्णय नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या संमेलनात घेण्यात आला.

या अभ्यास पथकाच्या सदस्यांमध्ये चीन येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या परिषदेत विचारविमर्ष होऊन अशा पद्धतीची बँक व्यवहार्य आणि आवश्यक असल्याबाबत सर्व देशांची सहमती झाली आहे; अशी माहिती चायना इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे उप संचालक लियू युफा यांनी दिली. यापुढे बँकेच्या प्रत्यक्ष स्थापनेचा कार्यआराखडा निश्चित करण्याचे काम हे अभ्यास पथक करेल; असे या पथकातील भारताचे प्रतिनिधी आणि ऑब्झर्वर रिसर्च फौंडेशनचे तज्ज्ञ एच एच एस विश्वनाथन यांनी सांगितले.

Leave a Comment