रितिकसोबत पुन्हा झळकणार कैटरीना

गेल्या काही दिवसापासून ‘एक था टायगर’ हिट झाल्याने बॉलीवूडची चिकनी चमेली असलेली कैटरीना सध्या फॉर्म मध्ये आहे. तिच्या सिनेमाने दीडशे कोटीचा टप्पा पार केल्याने सध्या ती खुपच खूष आहे. त्यामुळे तिला मागणी वाढली असून मोठ मोठे दिग्दर्शक तिच्या घरी रांगा लावून आहेत. नुकताच तिने रितिक सोबतचा एक सिनेमा साईन केला असून, लवकरच ती या सिनेमातून झळकणार आहे.

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सध्या रितिक व कैटरीनाच्या जोडीवर सध्या खूप खूष आहे. त्यामुळेच सिद्धार्थने आगामी काळात हॉलिवूडचा ब्लॉक ब्लास्टर आलेल्या ‘नाईट एंड डे’ या सिनेमाचा रिमेक तयार करायचे ठरविले आहे. त्यासाठी त्याने काही दिवसापूर्वीच रितीकला साईन केले होते. या सिनेमात रितिक सोबत नायिका कोन असणार यावरुन बरीच चर्चा सर्वत्र रंगली असताना, अचानक कैटरीना कैफचे नाव त्यांनी या सिनेमासाठी फायनल केले आहे.

याबाबत बोलताना सिनेमा दिग्दर्शक सिद्धार्थ म्हणाला, ‘हा सिनेमा पूर्णपणे ‘नाईट एंड डे’ या सिनेमाचा रिमेक नाही. या सिनेमात प्रेक्षक वर्गासाठी खूप काही नवीन आहे.’