बॉलीवूडचे महानायक असलेले बिग बी अमिताभ बच्चन सध्या खोकला लागल्याने त्रस्त आहेत. त्यातच दोन दिवसापासून सर्जरी झालेल्या ठिकाणी पोटात पुन्हा दुखत असल्याने ते काहीसे व्यतीत झाले आहेत. या बाबतची माहिती खुद्द बिग बी अमिताभने मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवरून दिली आहे.
पोटदुखीमुळे अमिताभ पुन्हा त्रस्त
रविवारी रात्री अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही एनटीबोयेटिक घेतली मात्र खोकला काही कमी झाला नाही. खोकल्या सोबतच मध्यरात्रीनंतर फेबुवारी महिन्यात पोटाचे ओपरेशन झाले होते, त्याठिकाणी पुन्हा पोटात दुखू लागल्याने डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी काही मेडिसिन घेतले तर काही घरगुती इलाज केला असल्याचेहि त्याने टीवीट केले आहे.
फेबुवारी महिन्यात झालेल्या ओपरेशन झाल्यानंतर बिग बी पोटाची खूप काळजी घेत असून नियमितपणे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करीत आहेत. डॉक्टरांच्या मते ऑपरेशन झाले असले तरी अजून काही दिवस तर त्यांना अशाप्रकारचा त्रास सहन करावा लागणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
