माधुरी थिरकली लावणीवर

महाराष्ट्रामधील लोकनृत्य म्हणून लावणीला साता समुद्रापलीकडे लोकप्रियता मिळाली आहे. बऱ्याच दिवसानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने या लावणीवर अदाकारी सादर करून प्रेक्षकाची मने जिंकली. ‘झलक दिखला जा-५’ शोच्या वेळी माधुरीने खास नववारी साडी, नथ घालून तीने तीन लावण्यावर थिरकत सर्वांची वाहवा मिळवली.

कलर्स वाहिनीवरील या शो मधून धक धक गर्ल माधुरी दीक्षित सुरुवातीपासुनच फेमस झाली आहे. झलक दिखला जा या शोची जज असलेली माधुरी दीक्षित प्रत्येकवेळी वेगवेगळ्या स्टेप्स शिकवत असल्याने खुपच पॉप्युलर झाली आहे. या शोचा रविवारी ग्रेड फिनाले असल्याने माधुरी पती डॉक्टर श्रीराम नेने व दोन मुलासोबत स्टेजवर आली होती. यावेळी माधुरीने ‘मै कोल्हापूर से आयी हू’, ‘अप्सरा आली’ आणि ‘हिचकी’ या तीन लावणीवर थिरकली.

हर्षल यांनी या माधुरीच्या तीन ही गाण्याचे कोरीयोग्राफी केली होती. हर्षलने शिकवलेल्या सर्वच स्टेप्स माधुरी लगेचच कॅच करीत असल्याने तो चांगलाच आश्चर्यचकित झाला होता. माधुरीने केलेले तीनही लावण्यावरील डान्स एकंदरीत अप्रतिम असाच होता.