अकोले: कोळसाकांडामुळे अंगावर पडलेले डाग झाकण्यासाठीच आपल्यावर आरोप केले जात असल्याचे सांगून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि थेटपणे काँग्रेसवर तोफ डागली.

सरकारला अडचणीत आणणारी विधाने अथवा कृत्य करू नयेत; हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे आवाहन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधून कारभार करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; याला न जुमानता उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य मंत्री पदाचा त्याग केल्यानंतरच्या पहिल्याच सभेत अजितदादांनी काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला.
माध्यमांना हाताशी धरून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र सफल करण्यासाठीच विधीमंडळात अनेकदा चर्चा होऊनही अचानक सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा विषय उकरून काढला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. या प्रकरणातील सत्य काय आहे ते निर्विवादपणे जनतेसमोर यावे यासाठी मी स्वत:च्या मर्जीने आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा फेकला आहे. त्यासाठी माझ्यावर कोणाचा दबाव वगैरे नाही; असेही त्यांनी स्पष्ट केले.
जालासंधारण विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचे आरोप फेटाळून लावत पवार म्हणाले की; धरणांचे खर्च आमच्या मर्जीने नव्हे तर प्रकल्प रखडल्यामुळे वाढले आहेत. हे सत्य जनतेसमोर येण्यासाठीच लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढावी अशी आपली मागणी असल्याचेही पवार म्हणाले.