नवी दिल्ली दि.१- परराष्ट्र मंत्रालयाने आजपासून म्हणजेच १ आक्टोबरपासून पासपोर्टसाठी आकारण्यात येणार्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे परदेशी जाऊ इच्छीणार्या नागरिकांना आता पासपोर्टसाठी जादा दाम मोजावा लागणार आहे. पूर्वी ज्या पासपोर्टसाठी (जनरल कॅटेगरी) १ हजार रूपये शुल्क आकारण्यात येत होते त्यासाठी आता नागरिकांना ५०० रू जादा मोजावे लागणार आहेत तर तत्काळ पासपोर्टसाठी २५०० ऐवजी ३५०० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. १४ वर्षांखालील मुलांचा पासपोर्ट घेताना चारशे ऐवजी १००० रूपये भरावे लागणार आहेत.
पासपोर्टसाठी मोजा जादा दाम
इंधन दरवाढीपाठोपाठच पासपोर्टचे दर वाढल्याने महागाईने आधीच पिचलेल्या नागरिकांसाठी खर्चाचा नवा बोजा तयार झाला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वी २९ मार्च २००२ ला पासपोर्टसाठीचे शुल्क वाढविण्यात आले होते असे समजते.
