‘हिरोइन’वर प्रीति व कैटरीना नाराज

दिग्दर्शक मधुर भंडारकरचा ‘हिरोइन’ हा सिनेमा सध्या या ना त्या कारणावरून सध्या लाईम लाईटमध्ये आहे. या मधील ‘हिरोइन’ची व्यक्तीरेखा स्टार अभिनेत्री असलेल्या प्रीति झिंटा व बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफच्या पर्सनल लाईफशी निगडीत असल्याने सध्या दोघीही नाराज झाल्या आहेत.

या सिनेमामधील करीना कपूरचा रोल एका क्रिकेटरसोबत डेट करताना दाखविण्यात आला आहे. प्रीति आणि युवराज सिंह एके काळी खुप जवळ जवळ होते. त्यासोबतच तिची कारकीर्द ज्यावेळी कमकुवत होत जाते त्यवेळी ती उद्योगपतीशी विवाह करून आयपीएल मधील टीम विकत घेते असे दाखविण्यात आले आहे. प्रीति व उद्योगपती नेस वाडियाने टीम खरेदी केली होती. दोघांचे बराच काळ अफेअर चालेले होते. तसे पहिले तर शिल्पा शेट्टीला देखील हा रोल मॅच होतो. तिने पण उद्योगपतिशी विवाह करून आयपीएलचा संघ खरेदी केला आहे.

या सिनेमातील आणखीन एका सीनमधून कैटरीना कैफवर पण रिमार्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये तिच्या बर्थ डेट वरून झालेला वाद रंगविण्यात आला आहे. बॉलीवूडमधील बरीच मंडळी या सिनेमावर नाराज असून यामध्ये केवळ एकतर्फी बाजू मधुरने दाखवली असल्यची चर्चा आहे. सध्या प्रीति नाराज असली तरी अजून तिने मधुरशी मात्र याबाबत संपर्क साधलेला नाही.

Leave a Comment