ओझरचा विघ्नेश्वर किवा विघ्नहर

ozar

विघ्नहर म्हणजे अडचणींचे निवारण करणारा. ओझरचा विघ्नहर हा अष्टविनायकातील सातवा गणपती. या गणेशाने विघ्नासूर राक्षसाचा वध केला म्हणून त्याला हे नाव पडले असेही सांगितले जाते. कुकडी नदीकिनारी असलेले ओझर हे छोटेसे गांव. विघ्नहर गणेशाच्या मंदिराचा घुमट सोन्याचा मुलामा दिलेला असून असा घुमट असलेले अष्टविनायकातले हे एकमेव मंदिर आहे. देऊळ पूर्वाभिमुख आहे आणि मंदिराभोवती दगडी भिंत आहे. येथून लेण्याद्रीचा डोंगर दिसतो.

Vigneshwar1

मंदिराचा सभामंडप २० फूट लांबीचा असून दोन ओवर्‍या आहेत. गणेशापुढे संगमरवरी मूषकमहाराज आहेत. मंदिराच्या भितींवर अतिशय सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत. गर्भागृहात पूर्वाभिमुख मूर्ती असून ती बैठी आहे. गणेशाच्या डोळ्यात मौल्यवान माणके बसविलेली असून कपाळावर हिरा बसविलेला आहे. नाभीतही रत्ने आहेत. रिद्धीसिद्धीच्या मूर्ती दोन्ही बाजूंना आहेत. मंदिराचा घुमट बाजीराव पेशवे पहिले यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून वसई सर केल्यानंतर बांधला असल्याचे सांगतात. ही गोष्ट आहे १७८५ सालातली. मंदिराच्या भोवती असलेली दगडी भिंत इतकी रूंद आहे की त्यावरून सहज चालत जाता येते.

Vigneshwar

पुणे नाशिक महामार्गावरच हे ठिकाण असून एकाच दिवसाच्या ट्रीपमध्ये ओझर आणि लेण्याद्री अशा दोन्ही गणपतीस्थानांना भेट देता येते. थोडा वेळ असेल तर एखादा मुक्काम करून शिवनेरी किल्ल्याची सफरही करता येते.

 

Leave a Comment