वॉटसनवर अवलंबून नाही ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनवरच अवलंबून आहे अशी टीका सध्या मीडियातून केली जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ हा वॉटसनवर अवलंबून नसल्याचा खुलासा कर्णधार जॉर्ज बेलेने केला आहे. टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात शेन वॉटसनने दमदार खेळी करीत ऑस्ट्रेलिया संघाला सुपर आठ फेरीपर्यंत पोहचवले आहे.

टीम ऑस्ट्रेलियाची ही सांघिक कामगिरी आहे. त्यामुळे एका खेळाडूवर अवलबून कोणताच संघ विजय मिळवत नाही. वॉटसनने संघासाठी चांगली खेळी केली आहे. त्याचे हे योगदान विसरण्यासारखे नाही. मात्र त्यामुळे संघातील बाकीच्या खेळाडूचे योगदान तितकेच महत्वाचे असल्याचेही कर्णधार जॉर्ज बेलेने स्पष्ट केले.

आज शुक्रवारी भारताविरुद्च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कस लागणार आहे. हा सामना जिंकला तरच ऑस्ट्रेलिया संघाला सेमीफायनलपर्यंत मजल मारता येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी आज ‘करो या मरो’ अशी स्थिती राहणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment