नेपाळमध्ये विमान कोसळून १९ ठार

काठमांडू दि.२८ – काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरून निघालेले सीता एअर कंपनीचे खासगी विमान उड्डाणानंतर दोन तासात अपघातग्रस्त होऊन झालेल्या अपघातात विमानातील क्रूसह सर्व प्रवासी ठार झाले असल्याचे समजते. हे विमान आकाशातच पेटले आणि त्यानंतर मनोहारा नदीजवळ कोसळले. एव्हरेस्ट पर्वतरांगातील लुंकला येथे हे विमान प्रवाशांना घेऊन निघाले होते.

विमानात वैमानिकासह तीन जणांचा क्रू होता तर १६ प्रवाशांपैकी तीन नेपाळी, ७ ब्रिटीश आणि ५ चिनी नागरिक होते असे काठमांडू विमानतळ प्रमुख नारायण बास्टाकोटी यांनी सांगितले. विमानात कोणीही भारतीय प्रवासी नव्हता याची खात्री भारतीय दूतावासाने करून घेतली असल्याचे समजते.

 

Leave a Comment