राज ठाकरेंवर अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तीसहजारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले असून दि. १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रेम शंकर या वकिलाने ठाकरे यांनी सन २००८ मध्ये केलेल्या भाषणात बिहारींबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे यांच्यावर सब्जी मंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment