बॉलीवूडमधील जर कोणी हॅडसम हिरोचे नाव घेत असेल तर सर्वात पहिल्यांदा रितिक रोशनचे नाव पुढे येते. काही जनाच्या मते रितिकची बॉडी अपील करण्यासारखी असून त्यामुळेच तो हॉलीवूडमधील नायक वाटतो. काईटस सिनेमाची निर्मिती केवळ हॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळावी या उदेशाने करण्यात आली होती. मात्र हा सिनेमा हिट न झाल्याने अंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावी तशी लोकप्रियता त्याकाळी रितीकला मिळाली नव्हती.
येत्या काही दिवसातच फॉक्स स्टार स्टुडीओचा नाईट एंड डे चा ऑफिशियाल हिंदी रिमेक तयार होत आहे. मूळ सिनेमात हॉलिवूडचा स्टार टॉम क्रुझरने हा कॉमेडी व अक्शन रोल केला होता. या सिनेमाचा हिंदी रिमेक करण्याचे ठरले त्यावेळी टॉम क्रुझरचा रोल कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याचे उत्तर आता सापडले असून या हिंदी रिमेक सिनेमात रितिक रोशन काम करणार आहे.
काही दिवसापुर्वीच या सिनेमासाठी रितिकला साईन करण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस सिनेमाचे शूट सुरु होणार आहे. या सिनेमात रितिक आता कशाप्रकारे कॉमेडी व अक्शन असलेला रोल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.