पाच मजली इमारत कोसळून ६ ठार

पुणे: तळजाई मंदिर पठारावर नव्यानेच उभारण्यात आलेली तच माजली इमारत कोसळून एक पुरुष आणि ५ महिला जागीच ठार झाल्या. इमारतीच्या ढिगार्‍याखाली आणखी १० ते १२ जण अडकल्याची शक्यता असून अग्निशामक दल त्यांना काढण्याच्या प्रयत्नात आहे.

सहकारनगरजवळच्या तळजाई पठारावर सोमनाथ नावाची एक इमारत नुकतीच उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या कामावरून अंतिम हात फिरविण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीत कामाच्या पूर्ततेआधीच राहावयास आलेले एक कुटुंब आणि अन्य बांधकाम मजुरांचा मृतांमध्ये समावेश आहे.

अग्निशामक दल, पोलीस आणि स्थानिक नागरिक ढिगार्‍याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याच्या प्रयत्नात आहेत. या इमारतीचा पाचवा मजला अनधिकृत असून ही इमारत एका सत्ताधारी नगरसेवकाशी संबंधित असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.