
नवी दिल्ली दि.२०- भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल त्यांचे सहकारी अरविद केजरीवाल यांच्याशी फारकत घेतल्यानंतर रात्री उशीरा काळा पैसा देशात आणावा यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकलेल्या योगगुरू रामदेवबाबा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील पॉश गोल्फ क्लब लिंकस येथे ही भेट झाली त्यावेळी झालेल्या चर्चेस माजी लष्करप्रमुख व्ही.के सिंग हेही उपस्थित होते असे समजते. अर्थात या बैठकीबाबत बाहेर कांहीही जाहीर करण्यात आले नाही.
