राहुल गांधी आंतरराष्ट्रीय नेते: नरेंद्र मोदी

अहमदाबाद: राहुल गांधी हे केवळ देशाचेच नेते नाहीत; तर ते आंतरराष्ट्रीय नेते आहेत; असा उपहासात्मक टोला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी लगावला. राहुल यांनी मनात आणले तर ते भारतातच काय; इटलीतही निवडणूक लढवू शकतात; असेही मोदी म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद युवा विकास यात्रेदरम्यान मोदी यांनी काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांची यथेच्छ टिंगल केली. नुकतेच काँग्रेस प्रवक्ते रशीद अल्वी आणि सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ‘राहुल हे राष्ट्रीय नेते आहेत; तर मोदी गुजरातचे प्रादेशिक नेते आहेत. त्यामुळे या दोघांची तुलन होऊ शकत नाही;’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा मोदी यांनी समाचार घेतला.

मी गुजराचा प्रादेशिक नेता असल्याचा मला अभिमान आहे. मात्र राहुल हे केवळ देशाचे नेते आहेत; हे मला मान्य नाही. ते अंतरराष्ट्रीय नेते आहेत; अशा शब्दात मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली. या आधी रविवारी मोदी यांनी; थेट विदेशी गुंतवणुकीच्या धोरणाचा इटलीच्या किती उद्योगपतींना लाभ होणार आहे; असा सवाल करून मोदी यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनियांनाच लक्ष्य केले होते.

Leave a Comment