कलमाडी यांच्या सहय्यकाला अटक

नवी दिल्ली: बनावट कागदपत्रांच्या आधारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संयोजन मंडळावर स्थान मिळविणार्‍या नचिकेत कपूर या दिल्ली पोलिसांनी अटक केली. याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कपूरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या काळात स्पर्धांचे संयोजन समिती अध्यक्ष आणि राष्ट्रकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी खासदार सुरेश कलमाडी यांचा सहाय्यक म्हणून काम केले.

कपूर याच्याकडे पोलिसांना दिल्ली विद्यापीठाची काही बनवत कागदपत्र सापडली असून याच कागदपत्रांच्या सहाय्याने त्याने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पूर्वी सहा महिने संयोजन मंडळात शिरकाव केला. दिल्ली पोलिसांचा स्थानिक अन्वेषण विभाग या प्रकरणाचा तपास करीत आहे.

Leave a Comment