शाहरूखच्या म्हणतो, नो किसिंग, नो हॉर्स रायडींग

बॉलीवुडचा किंग म्हणवून घेणारा शाहरुख खान आपल्या अटीवर चित्रपट करतो. प्रत्येक चित्रपट साइन करण्याआधी निर्मात्यांपुढे तो दोन अटी ठेवतो. त्या अटी मान्य असतील तरच तो चित्रपट स्वीकारतो अन्यथा नाही.

अलीकडेच मिळालेल्या वृत्तानुसार शाहरुखच्या कॉन्ट्रक्टमध्ये तो कोणत्याही हिरोइनबरोबर लिपलॉक करणार नाही आणि घोड्यावर बसणार नाही अश्या दोन अटी असतात. घोडा न शाहरुखला पाठदुखीचा त्रास झाल्यापासून तो हॉर्स रायडिंग करत नाही.

काही वर्षापूर्वी शाहरुख खानला आपल्या पाठीच्या मणक्यात होणार्‍या त्रासामुळे एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली होती. या शस्त्रक्रियेनंतर शाहरुख खान म्हणाला होता की, आपण ठीक आहोत. मात्र आताच काही बोलणे घाईचे ठरेल. जीवन कधीपर्यंत राहणार हे कोणाला माहित नाही. शस्त्रक्रिया चांगली ठरेल की वाईट हे लगेच सांगता येणार नाही.

शाहरुख खान घोड्यावर बसण्यास का नकार देतो हे कळले पण नो किसिंगच्या मागे काय कारण आहे, हे अद्याप कोडेच आहे. कदाचित या अटीमागे गौरी असावी.