
’सिरिअल किसर’ म्हणून ओळखल्या जाणार्या इमरान हाश्मीचा प्रत्येक चित्रपटात नायिकेसोबत बोल्ड सीन असतोच. मात्र, अशा सीनविषयी तो पत्नीशी कधी चर्चा करत नाही. त्याने स्वतः कबूली ही दिली आहे.

’सिरिअल किसर’ म्हणून ओळखल्या जाणार्या इमरान हाश्मीचा प्रत्येक चित्रपटात नायिकेसोबत बोल्ड सीन असतोच. मात्र, अशा सीनविषयी तो पत्नीशी कधी चर्चा करत नाही. त्याने स्वतः कबूली ही दिली आहे.
इमरान हाश्मीचा ’राज थ्री’ सध्या बॉक्सऑफिसवर चांगला पैसा कमवत आहे. कथानक किंवा अभिनयाच्या बाबत चित्रपट डावा असला तरी या भयपटाला थ्रीडीचा तडका असल्याने चित्रपटाने चांगला गल्ला जमा केला आहे. चित्रपटाने चार दिवसांत चाळीस कोटींचा आकडा गाठला होता. या चित्रपटातही इमरानने त्याचा ’हातखंडा’ असलेले सीन दिले आहेत. मात्र, अशा सीनवर त्याची पत्नी आक्षेप घेत नाही का असा प्रत्येक दर्शकाला प्रश्न पडतोच.
या प्रश्नाचे इमरानने दिलखुलास उत्तर दिले. तो म्हणाला, ’माझा प्रेमविवाह आहे. त्यामुळे पत्नी परवीन मला पहिल्यापासून ओळखते. कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारण्यापूर्वी मी त्याची संपूर्ण कथा वाचतो. पत्नीलाही चित्रपटाचे सर्व कथानक सांगतो. मात्र, त्यातील अशा सीनविषयी तिच्यासोबत बोलत नाही. शिवाय तिनेही याबाबत कधी जाब विचारला नाही. तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. चित्रपटाची गरज म्हणून हे काम करावे लागते हे सुद्धा ती समजून घेते. मला तशा दृष्यांमध्ये पाहून तिला कधी असुरक्षितही वाटले नाही. माझा अडीच वर्षाचा मुलगा अयान मला टीव्हीवर पाहून खूप आनंदी होतो, शिवाय माझ्या गाण्यावरही भरपूर नाचतो.’