ठाणे: महागाईच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रोखून धरली. ‘दादां’ची गाडी रोखून धरणार्या स्वपक्षीय कार्यकर्त्याचे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

ठाण्यात पक्षाच्या आजी, माजी नगरसेवक पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या अजितदादांचे स्वागत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी रस्ता अडवून केले. आंदोलकांनी सिलेंडर ठेवलेली घोडागाडी रस्त्यात उभी करून दादांचा मार्ग रोखून धरला. महागाई आणि केंद्राने नुकत्याच केलेल्या इंधन दर वाढीचा यावेळी निषेध करण्यात आला.
सामान्य जनतेच्या भावना वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे राष्ट्रवादी पदाधिकार्यांनी सांगितले.