पाकमध्ये बॉम्बस्फोटात १५ ठार

इस्लामाबाद, दि.१६  – पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ ठार तर १२ जण जखमी झालेत. वायव्य पाकिस्तानमधील लोअर दीर परिसरात रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या स्फोटकांमुळे सकाळी हा स्फोट झाला. जखमीतील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेवरील बाजारपेठेत जात असलेल्या नागरिकांचा ट्रक रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या बॉम्बवरून गेल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तालिबानी संघटनेचे हे कृत्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तालिबान या परिसरात गेले कित्येक दिवस करत असलेल्या हत्त्यानी येथील नागरिकांचा त्यांना विरोध होत आहे.

Leave a Comment