आयसीसी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी धोनी

दुबई: आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कप्तान पदाचा मान भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि ‘कूल’ कप्तान महेंद्रसिंग धोनीला मिळाला आहे.

आयसीसीच्या एकदिवसीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या संघात भारताच्या गौतम गंभीर आणि विराट कोहलीने स्थान प्राप्त केले आहे.

आयसीसीचा संघ फलंदाजीच्या क्रमानुसार- गौतम गंभीर (भारत), अलिस्टर कूक (इंग्लंड), कुमार संगकारा (श्रीलंका), विराट कोहली (भारत), महेंद्रसिंग धोनी (भारत, कर्णधार, यष्टी रक्षक),मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया),शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान), मोर्नी मोर्केल (दक्षिण आफ्रिका), स्टीव्हन फिन (इंग्लंड),लसिथ मलिंगा (श्रीलंका), सईद अजमल (पाकिस्तान), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)

Leave a Comment