शाही दांपत्याने मासिकावर ठोकला दावा

लंडन: ब्रिटनच्या गादीचे वारस थोरले युवराज विल्यम्स यांच्या पत्नीचे अर्धनग्न छायाचित्र प्रसिद्ध करणार्‍या एका फ्रेंच मासिकावर शाही दांपत्याने मानहानीचा दावा ठोकला आहे.

विल्यम्स आणि त्याची पत्नी केट हे फ्रान्स येथे सुट्टीसाठी गेले असताना या मासिकाने छायाचित्र मिळविली आहेत. यापैकी अनेक छायाचित्रात केट अर्धनग्न अवस्थेत आहे.

ही छायाचित्र प्रसिद्ध करण्याबाबत या मासिकाने अनेक ब्रिटीश माध्यमांशी संपर्क साधला. मात्र ती राजघराण्याशी संबंधित असल्याने त्यांनी ही छायाचित्र प्रसिद्ध करण्यास नकार दिला.

राजघराण्यातील व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात डोकावल्याबद्दल ब्रिटीश राजघराण्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment