‘अय्या’ करणार….आयटम सॉंगची हॅटट्रिक

दिग्दर्शक सचिन कुंडलकरच्या बहुचर्चित ‘अय्या’ या सिनेमातील नटखट असलेल्या राणी मुखर्जीच्या नवीन लूकची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यातच आता बॉलीवूडमध्ये सिनेमा यशस्वी व्हावा असे वाटत असेल तर त्यासाठी आयटम सॉंग आवश्यक आहे असा नवा फंडा आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक सिनेमात आयटम सॉंग असणे आता जरुरीचे मानले जात आहे. त्यामुळेच ‘अय्या’ या सिनेमातून राणी मुखर्जी एक, दोन नव्हे तर तीन आयटम सॉंगवर थिरकत चक्क आयटमची हॅटट्रिक करणार आहे.

या तीन आयटम सॉंगमधून राणी आता हटके लूकमध्ये झळकणार आहे. एका आयटम सॉंगमध्ये ती बेली डान्स करणार आहे. तर दुसऱ्या गाण्यात ती साउथ इंडिअन स्टायलमध्ये थिरकणार आहे तर तिसऱ्या प्रकारात मात्र ती मराठमोळी लावणीचा तडका सादर करणार आहे. एकाच सिनेमातून तीन वेगवेगळया प्रकारचे डान्स सादर करून राणी सध्या धमाकेदार एन्ट्री करणार आहे असे दिसते. या तीनही प्रकारच्या आयटम साठी तिने खूप मेहनत घेतली आहे.

बऱ्याच दिवसाच्या विश्रातीनंतर राणी कमबॅक करीत असल्याने तिची एन्ट्री जबरदस्त व्हावी यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्या ‘अय्या’ सिनेमातील तीन–तीन आयटम सॉंगला प्रेक्षक कसे स्वीकारतात यासाठी सिनेमा रिलीज व्हायची वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment