बॉलीवूडवर आतापर्यंत खान आणि कपूर फॅमिलीचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही दिवसापासून मात्र खानच सुपरस्टार राहिले आहेत. आता या खानमध्ये आणखीन एकाची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे हा खान कोण असणार याबाबत सर्वाना उत्सुकता लागली असणार.
बॉलीवूडमध्ये आणखीन एका खानची एन्ट्री
बॉलीवूडमधील लेटेस्ट न्यूज बघितली तर या प्रश्नाचे उत्तर लगेचच सापडेल. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या मोठ्या एवेन्टचा विचार केला तर त्याचे उत्तर लगेचच मिळेल. बॉलीवूडमधील बेबो म्हणजेच करीना कपूर ही ऑक्टोबरमध्ये तिची कपूर ही इनिंग संपवून आता खान या नावाने कारकीर्दीस नव्याने प्रारंभ करणार आहे.
करीना लग्नानंतर खान हे सरनेम लावणार की नाही हे अजून कफर्म झालेले नाही. मात्र तिने जर तिच्या नावा पुढे खान हे सरनेम जर जोडले तर तिची कारकीर्द मात्र झटक्यात पुढे येणार आहे. लग्न करीत असल्यामुळे तिच्या हातून जरी संजयलीला भन्साळीचा रामलीला हा सिनेमा सुटला असला तरी खान नावाने कारकीर्द सुरु केल्यास अनेक ऑफर तिच्याकडे येतील. या पूर्वीचा इतिहास पाहिला तर खान नावाच्या हिरोइनला इंडस्ट्रीजमध्ये खास अशी झलक दाखविता आली नाही. त्यामुळे आगामी काळात करीना काय करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
