झुंजार युवी आयसीसी फलंदाजांच्या यादीत

दुबई: कर्करोगाशी झुंज देऊन क्रिकेटमध्ये पुन:पदार्पण करणार्‍या युवराज सिंग याने टी-२० क्रिकेटमधील आयसीसीच्या पहिल्या २० फलंदाजात स्थान मिळविले आहे. या यादीत भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैना तिसर्‍या स्थानावर आहे.

या यादीत न्यूझीलंडचा ब्रँडन मक्कलम पहिल्या आणि वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल दुसर्‍या स्थानावर आहे. पुन: पदार्पणानंतर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या लढतीत झुंजार ३४ धावा करून युवराजने या यादीत १५ वे स्थान पटकाविले आहे.

गोलंदाजांच्या यादीत पहिल्या २० मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. पाकिस्तानचा सईद अजमल या यादीत पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा ग्रीम स्वान आणि दक्षिण आफ्रिकेचा जोहान बोथा दुसर्‍या स्थानावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन प्रथम क्रमांकावर आहे.

Leave a Comment