सुरेश जैन यांना जामीन नाकारला

औरंगाबाद: जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणाचे सूत्रधार आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळून लावला.

जळगाव येथील घरकुल घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या जैन यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. ए. जोशी यांनीही जैन यांना जामीन देण्यास नकार दिला.

जैन यांच्या वतीने अ‍ॅड. उदय ललित यांनी युक्तिवाद केला; तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले.

Leave a Comment