हिरोइन करीना कपूर सध्या ‘हिरोइन’ सिनेमाच्या प्रमोशनच्या व लग्नाच्या तयारीत अशा दोन्ही कामात सध्या बीजी आहे. त्यासाठी सध्या तिची भटकंती सुरु आहे. नुकतीच ती झी टीवीवरील रिअलिटी शो असलेल्या ‘डान्स के सुपर स्टार’च्या मंचवर पोहचली होती. यावेळी मंचवर तिने डान्स मास्टर मिथुन चक्रवर्ती सोबत जोरदार ठुमके लावले. या ठिकाणी करीनाने दमदार सादरीकरण करून माहोल कॅश करण्याचा प्रयत्न केला.
‘हिरोइन’ करीना थिरकली मिथुन सोबत
दिग्दर्शक मधुर भांडारकरचा बहुचर्चित ‘हिरोइन’ हा सिनेमा यूटीवी मोशन पिक्चर द्वारा तयार करण्यात आला आहे. हा सिनेमा २१ सप्टेंबर रोजी देशभरात रिलीज होणार आहे. करीना कपूर लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वीचा सिनेमा म्हणून त्याची ओळख असणार आहे. ‘हिरोइन’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी करीना डान्स के सुपर स्टारच्या मंचवर गेली होती. यावेळी तिने डान्स मास्टर मिथुन चक्रवर्ती सोबत तर थिरकली शिवाय या शो मध्ये सहभागी झालेल्या ‘लिटल मास्टर’ म्हणजेच लहान मुलासोबतसुद्धा दमदार डान्स करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय तिने यावेळी लहान मुलाने विचारलेल्या प्रश्नाना तितक्याच हजरजबाबीपणे उत्तरे दिली.
लग्नानंतर हिरोइनचे मीटर डाऊन होते अशी नेहमीच चर्चा इंडस्ट्रीजमध्ये ऐकायला मिळते. त्यामुळे येत्या काळात ही म्हण करीनाच्या बाबतीत देखील लागू पडते का ते पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.
