शिल्पाकडे नाही सिनेमासाठी वेळ

बॉलीवूडमधील एकेकाळची स्टार अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिचा मुलगा विहानच्या देखभालीत बीजी आहे. सध्या या कामातच ती व्यस्त असल्याने त्यामुळे तिला अभिनयाच्या बाबतीत विचार करायला देखील वेळ नाही. त्यामुळेच तिने आगामी काळात सिनेमासाठी तिच्याकडे बिल्कुल वेळ नसल्याचे सांगून टाकले आहे.

विहानाचा जन्म २१ मे रोजी झाला. त्यानंतर शिल्पा कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली नव्हती. नवी दिल्लीमध्ये एका ब्रांडच्या प्रमोशनसाठी ती पहिल्यांदाच आली होती. त्यावेळी तिने मनमोकळ्यापणे सर्वांशी गप्पा मारल्या.

या बाबत बोलताना शिल्पा म्हणाली, ‘ सध्या मी खऱ्या अर्थाने मातृत्वचा आनंद घेत आहे. त्यामुळे या आनंदापेक्षा दुसरा काही आनंद महिलाच्या जीवनात असेल असे मला तरी वाटत नाही. विहानच्या देखभालीच्या कामांमुळे माझी सध्या तरी सिनेमात काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून सिनेमासाठी येत असलेल्या अनेक ऑफर नाकारल्या आहेत. काही दिवसाच्या ब्रेकनंतर मात्र निश्चितपणे पुन्हा सिनेमात काम करण्यासाठी विचार करेन.’