सैफ-करीनाच्या लग्नाची पत्रिका वाटण्यास सुरुवात

गेल्या काही दिवसापासून सैफ-करीनाचे लग्न कधी होणार याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. ती उत्सुकता आता संपली असून सैफ-करीनाचा विवाह निर्धारित कार्यक्रमा नुसार १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे कार्ड छापुन तयार झाले असून काही जणांना सैफ अली खान व शर्मिला टागोर यांच्याकडून लग्नाचे निमंत्रणही भेटले आहे.

लग्न कुठे होणार याबाबत मात्र खान व कपूर परिवारच्या वतीने गोपनीयता पाळण्यात आली आहे. मात्र लग्नानंतरचे काही कार्यक्रम हरियाणातील पतौडी पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणीच रिसेप्शनचा कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. दोन्ही परिवाराकडून लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे.

आतापर्यंत करीना कपूरकडून लग्नाच्या बाबतीत काही विरोधीभास कमेंट ऐकावयास मिळत होत्या. मात्र गेल्या महिन्यातच शर्मिला टागोरने हा विवाह ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे सांगितले होते. ठरलेल्या कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे लग्न, १७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत तर १८ ऑक्टोबर रोजी पतौडी येथे रिसेप्शन होणार असल्याचे समजते मात्र याला दोन्ही परिवाराच्या वतीने अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकला नाही.

Leave a Comment