पलेस्टाईनच्या उभारणीत भारताची भूमिका ठाम: पंतप्रधान

नवी दिल्ली: पॅलेस्टाईनला पाठींबा देण्याची भारताची भूमिका ठाम असून देशाच्या परराष्ट्र धोरणाचा तो महत्वपूर्ण भाग असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

भारत भेटीवर आलेले पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांच्याशी झालेल्या औपचारिक भेटीनंतर ते बोलत होते. भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान मंगळवारी झालेल्या करारानुसार भारत शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पलेस्टाईनला सहकार्य उपलब्ध करून देणार आहे.

सार्वभौम राष्ट्र म्हणून पॅलेस्टाईनला राष्ट्रसंघाची मान्यता मिळविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात भारताने महत्वपूर्ण भूमिका बजावली असून यापुढेही हे सदस्यत्व मिळण्याबरोबरच पलेस्टाईनचा विकास आणि राष्ट्रबांधणीत भारत सहकार्य करेल; अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

Leave a Comment