
गुजराथेत मेहसाणा जिल्ह्यात मारूती उद्योग सुरू करत असलेल्या नव्या प्रकल्पात ८०० रोबो काम करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून हा प्रकल्प २०१५ मध्ये सुरू होत आहे. या उद्योगात मारूती सुझुकीने चार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे.
तीस वर्षांपूवी हरियानात आपला प्रकल्प सुरू केलेल्या मारूतीने याच प्रकल्पात आपली पहिली कार बनविली होती आणि अल्पावधीतच सर्वसामन्यांसाठी कारचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारी कंपनी अशी ओळख मिळविली होती. मात्र मणेसर येथील प्रकल्पात नुकत्याच झालेल्या संप व हिंसाचारामुळे उत्पादन १ महिनाभर बंद ठेवण्याची वेळही कंपनीवर आली आणि मोठ्या नुकसानीलाही त्यांना सामोरे जावे लागले. या प्रकल्पात वारंवार संप पुकारले गेले आणि वारंवार कंपनी बंद ठेवावी लागली. या काळात कंपनीच्या उत्पादनात ४१ टक्के घट झाली.
