सनीला करायचाय कौटुंबिक सिनेमा

पोर्न स्टार असलेली सन्नी लियोन गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये चांगलीच रमलेली दिसत आहे. ‘जिस्म-२’ या सिनेमातील तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून अनेक जण घायाळ झाले आहेत. त्यामुळे तिला आता बॉलीवूडमध्ये कायमचे टिकून राहयचे आहे. त्यासाठी सध्या ती टिपिकल अशा कौटुंबिक सिनेमाच्या शोधात आहे.

याबाबत सन्नी म्हणाली की, ‘ गेल्या कशी दिवसापासून मी कौटुंबिक सिनेमाची स्क्रिप्ट शोधत आहे. लवकरच मला अशा स्वरूपाचा एकादा सिनेमा मिळेल असे वाटते. त्यामुळे लवकरच माझे हे स्वपन पूर्ण होईल. अशास्वरूपाच्या रोलसाठी माझ्याकडे इंडस्ट्रीज मधील बऱ्याच आघाडीच्या दिग्दर्शकानी संपर्क साधला आहे. सध्या त्यांच्या सोबत माझी चर्चा सुरू आहे. मला हवे तसा रोल मिळाला की याबाबत घोषणा करेल.’

‘जिस्म-२’ सिनेमानंतर ती सध्या ‘रागिणी एमएमएस-२’ या सिनेमात प्रमुख रोल करीत आहे. हा सिनेमा २०११ साली आलेल्या ‘रागिणी एमएमएस’ या सिनेमाचा पुढील भाग आहे. त्याचे शूट सध्या सुरु असून, हा सिनेमा २०१३ साली रिलीज होणार आहे.

Leave a Comment