उन्मुक्त करणार नाही सचिन, द्रविडची कॉपी

१९ वर्षाखालील विश्वचषक भारताने जिंकल्याने कर्णधार असलेला उन्मुक्त चंद्र गेल्या काही दिवसापासून भलताच फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया सोबतच्या फायनल सामन्यात त्याने भारतीय संघाला त्याच्या शतकाच्या जोरावर एक हाती विजय मिळवून दिला होता. नुकत्याच एका मुलाखतीत उन्मुकतने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अथवा राहील द्रविडची कॉपी करणार नसल्याचे स्पष्ट केले.

उन्मुक्त म्हणाला, ‘आगामी काळात भारतीय ‘अ’ संघातून मला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी निवड समितिचा आभारी आहे. आगामी काळात न्यूझीलंड दौऱ्यावर आम्ही जाणार असून त्याची तयारी सध्या करीत आहे. त्यासाठी आवश्यक ती माहिती भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूकडून घेत आहे. त्या ठिकाणाच्या पिचचा व वातावरणाचा अभ्यास सध्या सुरु आहे. त्यासाठी मी विराट कोहलीशी संपर्क करत आहे.’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अथवा राहील द्रविड यांचा खेळ मला नेहमीच आवडतो. मात्र त्यांची खेळण्याची शैली वेगळी आहे आणि माझी शैली वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्या खेळाची कॉपी करता येणे शक्य नसल्याचे यावेळी उन्मुक्तने स्पष्ट केले.

Leave a Comment