महेंद्र सत्यम चीनमध्ये व्यवसाय वाढविणार

बीजिंग: चीनमध्ये पदार्पण करणारी पहिली कंपनी असलेल्या महेंद्र सत्यमने चीनमध्ये मोठ्या प्रमाणात व्यायासायवृद्धी करण्याचा निर्णय घेतला असून दूरसंचार, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रावर भर देण्याचा कंपनीचा मानस आहे.

भारतीय सॉफ्टवेअर कंपनी महिंद्र सत्यमने सन २००२ मध्ये चीनमध्ये पदार्पण केले असून शांघाय आणि नानजिंग येथे महिंद्र टेक आणि महिंद्र सत्यमचे मोठे केंद्र आहे.

भविष्यात चीनमध्ये दूरसंचार क्षेत्रात मोठा वाव असून त्यावर कंपनी लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांची संख्या दीड हजारापर्यंत वाढविण्याचा मानस असून या विस्तारीकरणानंतर कंपनीच्या व्यवसायात २४ टक्के वृद्धी होईल; असा विश्वास कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित गांधी यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने चीनमधील विस्तारीकरण महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले.