पाक संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही: राज

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाला महाराष्ट्रात एकही सामना खेळू न देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. डिसेंबर महिन्यात पाक संघ भारताच्या दौर्‍यावर येत आहे.

पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या ‘सूरक्षेत्र’वर राज यांनी नुकताच हल्लाबोल केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालणे बंद करेपर्यंत त्यांच्या कलाकार, खेळाडूना भारताने प्रोत्साहन देऊ नये; अशी राज यांची भूमिका आहे.

पाकिस्तानचा संघ दि. २५ डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान भारतात येत असून भारत पाक संघ ३ एकदिवसीय क्रिकेट सामने आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.

भारत पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुरळीत व्हावे यासाठी हा क्रिकेट डिप्लोमसीचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment