रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेंड कोण ?

बॉलीवूडमध्ये चॉकलेटी बॉय म्हणून रणबीर कपूरचे नाव घेतले जाते. त्यामुळेच त्याचे नाव इंडस्ट्रीज मधील प्रत्येक सुंदर हिरोइन सोबत जोडले जाते. मात्र यावेळी त्याचे नाव नवीनच हिरोइन सोबत जोडले गेल्याने सर्वांनाच थोडासा शॉक बसेल. कारण की बऱ्याच दिवसानंतर या ब्युटीफुल हिरोइन सोबत त्याचे नाव जोडले गेले आहे.

आतापर्यत दीपिका पादुकोण, कैटरीना कैफ व नर्गिस फाखरी सोबत रणबीरचे नाव जोडले गेले होते. काही दिवसापुर्वीच बॉलीवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफची गाडी रात्री १ वाजता रणबीरच्या घराजवळ पार्क केलेली दिसली. त्या चर्चेला पूर्णविराम मिळायाच्या आधीच रणबीर पुन्हा तिची एक्स गर्लफ्रेंड दीपिका सोबत जवळीक निर्माण करीत असल्याची चर्चा सर्वत्र पसरली असतानाच त्याचे नाव आता या नव्या अभिनेत्री सोबत जोडले जात आहे.

काही दिवसापूर्वीच्या लेटेस्ट गॉसिपनुसार चार्मिंग गर्ल अनुष्का शर्माने एका पार्टीचे आयोजन केला होते. या पार्टीमधून बाहेर येताना रणबीर अभिनेत्री रिया सेनच्या हातात हात घालून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून रणबीर व रिया सेन यांची वाढत चाललेली मैत्री सध्या बॉलीवूडमध्ये मात्र चर्चेचा विषय झाली आहे. या नवीन प्रकरणाबाबत मात्र रणबीरने सध्या तरी मौनाच बाळगणे पसंद केले आहे.

Leave a Comment