अँडी मरेने पटकावला अमेरिकन ओपन चषक

न्यूयॉर्क: अमेरिकन ओपन पुरुष एकेरीचा चषक जिंकून अँडी मरे याने इतिहास रचला. मरेचा हा पहिला ग्रँड स्लॅम विजय असून सन १९७६ नंतर अमेरिकन ओपन जिंकणारा तो पहिला ब्रिटीश खेळाडू ठरला आहे.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मरेची गाठ अनुभवी नोवाक जोकोविच याच्याबरोबर होती. अत्यंत अटीतटीच्या या लढतीत पाचव्या अंतिम सेटपर्यंत चुरस कायम राहिली. सुरुवातीचे दोन सेट ७-६, ७-५ असे जिंकून मरेने विजयाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या सेटमध्ये जोकोविचने २-६, ३-६ असा दणका देऊन मरेला विजय सोपा नसल्याचे दाखवून दिले.

शेवटच्या पाचव्या सेटमध्ये मात्र तो काहीसा ढेपाळला आणि मरेने हा सेट ६-२ असा सहज जिंकून अमेरिकन ओपन चषकही आपल्या नावावर केला.

Leave a Comment