युवराज हॅरी राहणार युद्धक्षेत्रापासून दूर

लंडन: हेलिकॉप्टरचे लढाऊ वैमानिक म्हणून अफगाणिस्तानात तैनात असलेले ब्रिटीश राजघराण्याचे युवराज हॅरी यांना तालीबान दहशतवाद्यांच्या विरोधात कामगिरीसाठी न पाठविण्याचा निर्णय नाटो फौजांच्या अधिकार्‍यांनी घेतला आहे.

प्रिन्स हॅरी यांचे अपहरण करण्याची अथवा त्यांना ठार मारण्याची धमकी तालिबानांनी दिली आहे. चार वर्षापूर्वीही अशाच प्रकारची धमकी आल्यानंतर प्रिन्स अफगाणिस्तानातून परतले होते. आता किमान सात दिवस त्यांना कामगिरीवर न पाठविण्याचा निर्णय नाटो सैन्यात सहभागी असलेल्या ब्रिटीश अधिकार्‍यांनी घेतला आहे.

नाटो सैन्याचे सचिव जनरल एंडर्स फॉग रासमुसेन यांनी मात्र ब्रसेल्स येथे पत्रकारांशी बोलताना; तालिबानांची धमकी ही विशेष चिंतेची बाब नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ हॅरी हे प्रिन्स आहेत म्हणून नव्हे; तर आम्ही आमच्या प्रत्येक जवानाच्या सुरक्षिततेची काळजी काटेकोरपणाने घेतो; असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment