सैफला बसणार दंड

गेल्या काही दिवसापासून सैफ अली खान काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतो. नुकतीच त्याने टोयोटा लैड क्रुझर लग्जरी कारची परदेशातून खरेदी केली आहे. त्याबाबत त्याच्याकडे एनफोर्सेमेंट डायरेक्टरेट कडून सध्या विचारणा केली जात आहे. मात्र त्याबाबत अजून तरी सैफने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे त्याला दंड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सैफने टोयोटा लैड क्रुझर लग्जरी कारची खरेदी करताना त्याच्या पेमेंटची एन्ट्री ३५ लाख रुपये दाखवली आहे. या कारची खरेदी केरळमधील के. एम. मोहमद या इसामच्या नावे केली आहे. ही कार त्याने दुबईवरून मागवली आहे. याबाबतीत सैफने अनेक प्रश्नाची दिलेली उत्तरे हे एनफोर्सेमेंट डायरेक्टरेट यांचे समाधान करणारी नाहीत. त्यामुळे सैफ अली खान अडचणीत सापडला आहे. काही दिवसापुर्वीच या अधिकाऱ्याने सैफची चार तास कसून चौकशी केली होती.

या अधिकाऱ्याने सध्या सैफला काही दिवसाची मुदत दिली आहे. त्यामुळे या मुदतीत सैफने जर अधिकाऱ्यांना हवी असलेली कागदपत्रे दाखवली नाहीतर त्याला दंड होण्याची शक्यता आहे.