अंगदुखी नकोय ? मग कॉफी प्या

कॉम्प्युटरवर सलग बैठे काम करून उद्भवणार्‍या अंगदुखीवर कॉफी पिणे हा उत्तम उपाय असल्याचा दावा ओस्लो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. सांधे आखडल्यामुळे होणार्‍या वेदना ग्रहण करणार्‍या संवेदकांना कॅफिनमुळे उत्तेजना मिळते. त्यामुळे सकाळी एक कप कॉफी पिऊन कार्यालयात गेल्यास कामादरम्यान अंगदुखीचा सामना करावा लागणार नाही, असेही या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

या प्रयोगात ४८ स्वयंसेवकांना सलग दीड तास कॉम्प्युटरवर बसून फक्त माउसचा वापर करून काम करण्यास सांगितले होते. त्यातील ज्या स्वयंसेवकांना आधीच कॉफी देण्यात आली होती त्यांनी मान, खांदे, कोपर व मनगटातील वेदना झाली नाही.