सलमानने केली मानधनात वाढ

बॉलीवूडचा सुपरस्टार असलेला सलमान खान ‘एक था टायगार’च्या यशाने हुरळून गेला आहे. या सर्व यशाचा माहोल कॅश करण्याचे सध्या त्याने ठरवलेले दिसत आहे. गेल्या काही दिवसात त्याचे सर्वच चित्रपट हिट ठरत असल्याने सध्या लकसुद्धा त्याच्याच बाजूने दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी मानधनात वाढ केली आहे. त्याची ही नवीन फीस सध्या बॉलीवूडमध्ये मात्र चर्चेचा विषय झाली आहे.

आगामी काळात दिग्दर्शक साजिद नाडीयादवला यांच्या किक या सिनेमासाठी सलमानने ६० कोटी रुपये फीस घेतली आहे. एकादा सिनेमा हिट झाला की स्टार मंडळी मानधनात वाढ करतात हा आज पर्यंतचा अनुभव आहे. मात्र ही वाढ काही जणांना पसंत पडत नाही. या सिनेमासाठी सलमान जर ६० कोटी घेणार असेल तर सिनेमाचे प्रोडक्शन बजेट ९० कोटी असणार आहे. जर सलमानच्या यशाचे रेकॉर्ड कायम राहिले तर एवढी फीस देऊनही दिग्दर्शक फायद्यातच राहणार आहे. त्याच्या ‘एक था टायगार’ची कमाई सध्या १९० कोटीच्या पुढे गेली आहे.

सलमानने मानधन वाढविल्याने त्यानंतर अक्षय कुमार व रणबीर कपूरने मानधनात वाढ केली आहे. अक्षय सध्या २० कोटी रुपये घेत आहे. तर रणबीर व अजय देवगण सध्या एका सिनेमासाठी १५ कोटी रुपये फीस घेत आहेत. काही दिवसापूर्वी रणबीर कपूर ७-८ कोटी रुपये फीस घेत होता. दोन ते तीन सिनेमा पडल्याने शाहरुख खानने मात्र मानधन अजून वाढविले नाही.

Leave a Comment