राणीमुळे होणार श्रीदेवीची आठवण

आगामी काळात येत असलेल्या ‘अय्या’ या सिनेमातून राणी मुखर्जी नवीन लूकमध्ये सर्वासमोर येत आहे. या सिनेमातील तीची ही अदा फॅन्सना भुरळ घालणारी ठरणार आहे. तिच्या या रोलमुळे सर्वाना १९९० साली ‘मिस्टर इंडिया’ मध्ये श्रीदेवीने केलेली डेरींगबाज भूमिकेची सर्वांना पुन्हा एकदा आठवण होणार आहे. या सिनेमात ‘काटे नही कटते…’ या गाण्यात श्रीदेवी जशी खास लूकमध्ये झळकली होती तशाच हटके लूकमध्ये राणी आता दिसणार आहे.

‘अय्या’ या सिनेमात राणीने जो गॉगल घातला आहे. तो सुद्धा सर्वांच्याच पसंतीला उतरणार आहे. नेवी ब्लु रंगाच्या साडीमुळे यामध्ये राणी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने सुंदर दिसणार आहे. या सिनेमात राणीने महाराष्ट्रायीन युवतिची भूमिका साकारली आहे. या रोलसाठी राणीने खूप मेहनत घेतली असून त्यासाठी तिने येथील संस्कृतीची पूर्णपणे माहिती करून घेतली आहे. त्यासाठी तिला मराठीतील काही स्टारची मदत घेतली आहे.

त्यामुळे राणी या सिनेमात मीनाक्षी या महारष्ट्रायीन युवतिचा रोल परफेक्टपणे साकारणार आहे. त्यासाठी तिने काही काळ जिम सुद्धा लावली होती. बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर ती या सिनेमातून दिसणार असल्याने तिच्या या सिनेमाकडून खूप काही अपेक्षा आहेत.

Leave a Comment