वडापावच्या शोधात काजल

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सिनेमाच्या शूट मध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसापासून ती एक दाक्षिणात्य सिनेमाच्या शूटसाठी युरोप मध्ये गेली आहे. ती शुटसाठी परदेशात जरी गेली असली तरी याठिकाणी तिला सतत भारतची आठवण होत आहे. तेथे गेल्यानंतरही मुंबईच्या वडापावची नेहमीच आठवण तीला होत आहे. त्यासाठी सध्या ती युरोप मधील सर्वच भारतीय रेस्टॉरंटला भेट देऊन वडापावचा शोध घेत आहे.

गेल्या काही दिवसापासून तीने सर्वच युरोपातील भारतीय रेस्तराँटला भेट दिली. मात्र तिला मुंबई मधील वडापावसारखा स्वाद काही याठिकाणी मिळाला नाही. केवळ वडापाव खाण्यासाठी काजलला युरोपमधील शूट लवकर संपवून मुंबईला परतण्याचे वेद लागले आहेत.

काही दिवसापूर्वीच काजलने दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या ‘स्पेशल चाबिज’ हा सिनेमा साइन केला आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत झळकणार आहे. या शिवाय ती सध्या तमिळ भाषेतील ‘मातरान’ आणि ‘तूहपाकी’ या दोन सिनेमात काम करीत आहे. या दोन्ही सिनेमाचे शूट पूर्ण झाले आहे. हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या वेळेस रिलीज होणार असल्याचे समजते

Leave a Comment