असीन पाहतेय लग्नाचे स्वप्न

बॉलीवूडमध्ये आल्यानंतर काही दिवसातच स्टार झालेली असीन सध्या लग्नाची स्वप्ने पाहत आहे. सिनेमात अनेक वेळा विवाहाच्या बंधनात अडकलेली असीन सध्या रियल लाइफ मध्ये ही लग्नाची वाट पाहत आहे. त्यामुळे आता असीन कधी लग्न करणार याची चर्चा मात्र सध्या जोरदार रंगली आहे. तिच्या या घोषणेमुळे फॅन्सना मात्र मोठा धक्का बसला आहे.

असिन सध्या अक्षयकुमार सोबत ‘खिलाडी ७८६’ सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात एक वेडिंग सीन आहे. हा लग्नाचा सीन केल्यानंतर मात्र असीनने रियाल लाईफमध्ये लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. याची कबुली देखील असिनने यावेळी सेटवर हजर असलेल्या तिच्या सहकाऱ्याशी गप्पा मारताना दिली आहे. असीन म्हणाली, ‘सिनेमात काम करताना अनेकवेळा लग्नाचे सीन केले आहेत. मात्र लग्नासाठी अजून पार्टनर शोधलेला नाही. लग्न करण्याचे ठरविले तर मी शोध घेईन.’

असिनने यापूर्वी अनेक सिनेमातून लग्नाचे कपडे घातले आहेत. ज्यामध्ये तिच्या ‘रेडी’ व ‘हाउसफुल-२’ या सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे असिन लग्न कधी करणार याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये जोर धरू लागली आहे.

Leave a Comment